Crime News  Pudhari
सांगली

Sangli Crime: मारहाणीतील जखमी तरुणाचा मृत्यू; खुनाचा गुन्हा दाखल

नागाव कवठे येथील घटना; दोघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : नागाव कवठे (ता. तासगाव) येथील मुलीची छेड काढल्याबद्दल जाब विचारल्याने झालेल्या मारहाणीतील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी दोघांविरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तुषार कृष्णा मंडले (वय 18, रा. नागाव कवठे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी ओंकार सुरेश वाघमोडे (वय 19) व एका 15 वर्षीय विधी संघर्षशीत बालकाचा संशयित म्हणून समावेश आहे. मनीषा कृष्णा शिरतोडे (रा. नागाव कवठे) यांनी संशयितांविरोधात फिर्याद दिली आहे. संशयित ओंकार हा तुषार याच्या नात्यातील मुलीची छेडछाड करीत होता. याचा जाब विचारण्यासाठी तुषार हा दि. 7 जानेवारीरोजी कवठेएंकद येथील आरफळ कालव्याजवळ ओंकार याच्याकडे गेला होता. यावेळी छेडछाडीच्या कारणावरून ओंकार आणि तुषार यांच्यात जोरदार वादावादी झाली.

यावेळी संशयित ओंकार याच्यासमवेत असणारा अल्पवयीन याने तुषार याला पाठीमागून पकडले व ओंकार याने चाकू काढून तुषार याच्या पोटात खुपसला. डोक्यावर, दंडावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. पोटात वार वर्मी बसल्याने तुषार हा गंभीर जखमी झाला. तुषार याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. संशयित ओंकार याला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. दोन्ही संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT