मणेराजुरी-बोरगाव रस्त्यावर खासगी बस जळून खाक 
सांगली

Sangli News : मणेराजुरी-बोरगाव रस्त्यावर खासगी बस जळून खाक

शॉर्टसर्किट होऊन बसला आग लागल्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : तासगाव - कवठेमहांकाळ रस्त्यावर मणेराजुरी ते बोरगावजवळ खासगी बसला अचानक आग लागून बस जळून खाक झाली. ही घटना रविवारी पहाटे घडली असल्याचे समजते. रविवारी सकाळी महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास खासगी बस (एम एच ०९, ई एम ८४४२) मणेराजुरीकडून कवठेमहांकाळच्या दिशेने जात होती. बस मणेराजुरी हद्दीतील कोड्याचे माळ येथे आली असता बसला अचानक आग लागली. रात्रीची वेळ अन्‌ बसमध्ये दोनच प्रवासी होते. त्यामुळे बस चालकाला आगीसंबंधी कोणाशी संपर्क साधता आला नाही. त्यामुळे बस पूर्णतः जळून खाक झाली.

राष्ट्रीय महामार्गचे सहायक पोलिस निरीक्षक साळवे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. बसचे चालक विशाल नीलकंठ स्वामी (रा. माधवनगर) यांच्याकडून पोलिस माहिती घेत आहेत. बसच्या एसीमध्ये शॉर्टसर्किट होऊन बसला आग लागली असल्याची माहिती समोर येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT