एकतर्फी प्रेमातून मोबाईल टॉवरवर चढणारा गजाआड File Photo
सांगली

Sangli News : एकतर्फी प्रेमातून मोबाईल टॉवरवर चढणारा गजाआड

कुपवाड एमआयडीसीमधील जेसन फाउंड्रीजवळील घटना

पुढारी वृत्तसेवा

कुपवाड : एकतर्फी प्रेमातून तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकण्याच्या उद्देशाने मोबाईल टॉवरवर चढलेल्या तरुणाला कुपवाड पोलिसांनी अखेर अटक केली आहे. अजय अविनाश जाधव (वय २१, रा. कुपवाड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अजय जाधव याने शनिवारी (८ ऑगस्ट) दुपारी पोलिसांच्या ११२ या आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला. 'माझा प्रेमभंग झाला असून मी कुपवाड एमआयडीसीमधील जेसन फाउंड्रीजवळील मोबाईल टॉवरवर चढलो आहे, मी आत्महत्या करणार आहे', असे त्याने पोलिसांना सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी पोलिस पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दल आणि आयुष हेल्पलाईनच्या टीमलाही तत्काळ पाचारण करण्यात आले.

पोलिसांनी अत्यंत कौशल्याने मोबाईल टॉवरवर चढलेल्या या तरुणाची समजूत काढून त्याला सुरक्षितपणे खाली उतरवले. अजय जाधव हा संबंधित तरुणी आणि तिच्या कुटुंबावर चिडलेला असल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. तसेच परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत त्याला अटक केली.

दरम्यान, कोणीही अशा प्रकारचे कृत्य करून दबाव टाकण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास नागरिकांनी थेट कुपवाड पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. अशा आक्षेपार्ह कृत्यांवर कुपवाड पोलिस कठोर लक्ष ठेवून असून भविष्यातही कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT