युपीआय कस्टमर केअरच्या नावाने लाखाची फसवणूक file photo
सांगली

Sangli Crime : युपीआय कस्टमर केअरच्या नावाने लाखाची फसवणूक

सावळीतील एकास गंडा; कुपवाड पोलिसात तक्रार

पुढारी वृत्तसेवा

कुपवाड : 'युपीआय कस्टमर केअर प्रतिनिधी बोलत आहे' असे सांगून भामट्याने सावळी (ता. मिरज) येथील नागरिकाची ९४ हजार ४०७ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. फोनवरून संपर्क साधत युपीआय सुरू करून देण्याच्या बहाण्याने ओटीपी मिळवून हा गंडा घालण्यात आला. याबाबत दादासाहेब आत्माराम गेजगे (रा. अमेयनगर) यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गेजगे यांच्या युपीआयवरून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यावर पैसे जमा होत नव्हते. त्यामुळे त्यांनी मोबाईलवर कस्टमर केअरचा क्रमांक शोधून संपर्क साधला होता. या वेळी अज्ञाताने आपण कस्टमर केअर प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगून त्यांची समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले व त्यांचा विश्वास संपादन केला.

संभाषण सुरू असतानाच गेजगे यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी भामट्याने मिळवला. त्यानंतर संशयिताने गेजगे यांच्या बँक खात्यातून ९४ हजार ४०७ रुपये परस्पर काढून घेऊन फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गेजगे यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी कुपवाड पोलिसांनी अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT