डिझेल अंगावर ओतून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न 
सांगली

Sangli : डिझेल अंगावर ओतून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

पोलिसांबरोबर झटापट; तिघे ताब्यात, निधी हडप केल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

सांगली : व्हसपेट (ता. जत) ग्रामपंचायतमधील अनुसूचित जातीचा निधी इतरत्र खर्च केल्याप्रकरणी दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ श्रीकांत गोविंद हुवाळे (वय 58, रा. व्हसपेठ, ता. जत) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी डिझेल ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यासोबत घोषणाबाजी करणार्‍या दोघांसह पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांची पोलिसांबरोबर झटापट झाली.

व्हसपेठ ग्रामपंचायतीमधील सरपंच आणि ग्रामसेवक यांनी गतवर्षी अनुसूचित जातीसाठी असणारा दहा टक्केनिधी परस्पर हडप केल्याचा हुवाळे यांचा आरोप आहे. याबाबत त्यांनी गटविकास अधिकारी आणि त्यानंतर 19 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. त्याची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ श्रीकांत गोविंद हुवाळे, महादेव भगवान उबाळे (39), आप्पासाहेब गुंडोपंत लेंगरे (32, सर्व रा. व्हसपेठ, ता. जत) हे बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. त्यांनी झेंड्याच्या चबुतर्‍यावर चढून घोषणाबाजीला प्रारंभ केला. यावेळी श्रीकांत यांनी कॅनमधून आणलेले डिझेल ओतून घेतले. पेटवून घेण्याचा प्रयत्न करीत असताना बंदोबस्तास असलेल्या सुहेल मुल्ला यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी पोेलिसांना धक्का देण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांची पोलिसाबरोबर झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन तिघांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न, स्फोटक द्रव्य कार्यालयात नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. नोटीस बजावून सायंकाळी तिघांनाही सोडण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT