Fraud Case Pudhari
सांगली

Sangli News : मल्लेवाडीत विवाहितेकडून सव्वादोन लाखांचा गंडा

एजंट आणि विवाहितेविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

मिरज : मल्लेवाडी (ता. मिरज) येथे नवविवाहितेने पतीला दोन लाख 30 हजार रुपयांचा गंडा घालून सोन्यासह पलायन केले आहे. याप्रकरणी पतीने एजंट विजयकुमार बजंत्री आणि नवविवाहिता आम्रपाली आनंदा माळी (रा. नाशिक) हिच्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे.

एजंट बजंत्री याने मध्यस्थी करून आम्रपाली हिच्यासोबत दि. 27 डिसेंबर 2024 रोजी विवाह लावून दिला होता. या लग्नासाठी पतीने दोन लाख 30 हजार रुपयांची रोख रक्कम आणि आम्रपाली हिच्या अंगावर सोने घातले होते. परंतु दि. 15 मे 2026 रोजी आम्रपाली हिने लग्नात अंगावर घातलेल्या सोन्यासह पलायन केले. दरम्यान, सोने आणि लग्नात दिलेली रक्कम दोन लाख तीस हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी रोहित भोर याने दोघांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT