Drowning news Pudhari
सांगली

Sangli Drowning Death | ‘म्हैसाळ’च्या कालव्यात पडून कदमवाडीतील महिलेचा मृत्यू

सलगरे येथे पाचव्या टप्प्यात मृतदेह आढळला

पुढारी वृत्तसेवा

कवठेमहांकाळ : मिरज तालुक्यातील कदमवाडी येथे धुणे धुत असताना म्हैसाळ योजनेच्या कालव्यात पडून छाया बाबासोा जगदाळे (वय ४४, रा. कदमवाडी-बेळंकी) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कालव्यात वाहून गेलेल्या छाया जगदाळे यांचा मृतदेह मिरज तालुक्यातील सलगरे येथे म्हैसाळ योजनेच्या पाचव्या टप्प्यात आढळून आला. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिसात झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, कदमवाडी येथे धुणे धुत असताना छाया जगदाळे कालव्यात पडल्या. पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने त्या वाहून गेल्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात आला. दरम्यान, सलगरे येथील म्हैसाळ योजनेच्या पाचव्या टप्प्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह बाहेर काढून कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT