Leopard Attack Pudhari
सांगली

Leopard Attack : अमरापूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी

वन विभागाकडून पाहणी, परिसरात भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

कडेगाव : अमरापूर (ता. कडेगाव) येथील खताळ वस्तीवर शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या जर्सी गाईच्या वासरावर हल्ला केला. या हल्ल्यात वासराच्या मानेला व शरीरावर जखमा झाल्या असून, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

येथील बाळासाहेब मुकुटराव वीर यांच्या गोठ्यात बिबट्याने शिरून वासरावर हल्ला केला. वासराचे ओरडणे आणि बिबट्याच्या हालचालींमुळे परिसरातील कुत्रे भुंकू लागले. आवाज ऐकून वीर कुटुंबातील सदस्यांना जाग आली. त्यांनी तातडीने दिवे लावून बाहेर पाहिले असता गोठ्याजवळ बिबट्या दिसून आला. लोकांचा आवाज आणि प्रकाशामुळे बिबट्याने तेथून पलायन केले. जखमी वासरावर सध्या उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली . दरम्यान, अमरापूर परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. रात्रीच्या वेळी शेतात व गोठ्यांकडे जाताना नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वन विभागाने गस्त वाढवून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT