सांगली : येथील माळबंगला जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे बुधवार दि. 29 रोजी सांगली-कुपवाडला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. नागरिकांनी मंगळवारीच पाण्याचा साठा करून ठेवावा, गुरुवारपासून पाणी पुरवठा पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती महापालिका पाणी पुरवठा विभागाच्यावतीने देण्यात आली.
महापालिका क्षेत्रात पाणी पुरवठा यंत्रणा अधिक कार्यक्षम आणि अखंडित ठेवण्यासाठी मंगळवार दि. 28 रोजी माळबंगला जलशुद्धीकरण केंद्र येथे अत्यावश्यक देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. या कामांतर्गत एसीबी पॅनल, ट्रान्स्फॉर्मर तसेच इतर तांत्रिक उपकरणांची महत्त्वपूर्ण दुरुस्ती करण्यात येत आहे. यासाठी जलशुद्धीकरण केंद्र सकाळी 10 पासून सायंकाळपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे सांगली व कुपवाड शहरात बुधवारी काही भागामध्ये पाणी पुरवठा होणार नाही किंवा तो अपुरा, कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.