कुंभारी परिसरात तिहेरी अपघात 
सांगली

Sangli Accident : कुंभारी परिसरात तिहेरी अपघात; लग्नाला जाणारे कुटुंब बचावले

पाच जण जखमी

पुढारी वृत्तसेवा

जत : जत तालुक्यातील कुंभारी परिसरात बुधवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास तीन चारचाकी वाहनांचा अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले. अपघातातून लग्नाला जाणारे कुंटुंब बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेवाडी-घोरपडी येथील गजानन जालिंदर शिंदे वाहनातून (एमएच 14 डीएन 0225) जतकडे लग्नासाठी निघाले होते. त्याचवेळी दुसरे वाहनही (एमएच 11 सीक्यु 0785) त्या मार्गावरून जात होते. दरम्यान, कर्नाटकातील विजयपूर येथून मसूर येथे खुनाचा पंचनामा करण्यासाठी निघालेले पोलीस वाहन ( केए 28 एमए 6469) देखील याच मार्गावर होते. कुंभारीजवळ या तिन्ही वाहनांचा एकमेकांवर धडक झाली.

या अपघातात रूपाली जालिंदर शिंदे (40, रा. सांगली), गजानन जालिंदर शिंदे (50, रा. सावळज, ता. कवठेमहांकाळ), अजित कदम (15, रा. सावळज), राजकुमार रामाण्णा रोळ्ळी (50, रा. कोनळ्ळी, ता. विजयपूर) आणि ईराण्णा माळी (35, रा. कोनळ्ळी) जखमी झाले. रूपाली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT