illegal liquor seized pudhari photo
सांगली

Sangli Crime: कुंभारीत अवैध विदेशी दारूचा साठा जप्त

वाहनासह ६.४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

जत : कुंभारी (ता. जत) येथे जत-नागज मार्गावरील न्यू अमोल हॉटेलनजीक जत पोलिसांनी छापा टाकून बेकायदेशीर विदेशी दारूचा साठा व वाहतूक करणारे वाहन जप्त केले. या कारवाईत एकूण अवैध दारूचा साठा व वाहन, असा ६ लाख ४५ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी हवालदार अभिजित तुकाराम यमगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय रंगनाथ जाधव (वय ५८, रा. कुंभारी) याच्याविरुद्ध जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी संशयिताच्या ताब्यातून १८० मि.लि.च्या विदेशी दारूच्या ३८४ बाटल्या, ६५० मि.लि.च्या ४८ बिअरच्‍या बाटल्या, ६२० मि.लि.च्या २४ बिअरच्‍या बाटल्या, ५०० मि.लि.च्या २१६ बिअरच्‍या बाटल्या आणि ५ लाख रुपये किमतीचे मालवाहू वाहन (क्र. एमएच १० ईक्यू-१५५६) जप्त केले. बेकायदेशीर व बिगरपरवाना दारूचा साठा बाळगून त्याची वाहतूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT