सांगली

Sangli kerosene supply: बारा वर्षांनी आले सांगलीला रॉकेल

आजपासून वितरण : सांगली, कुपवाडसह २७ गावांचा समावेश; ९ हजार लिटर मंजूर

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगलीसाठी तब्बल १२ वर्षांच्या खंडानंतर रेशनवर रॉकेल आले आहे. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पुरवठा करण्यात आलेल्या या रॉकेलचे वितरण सांगली आणि कुपवाड शहरासह २७ गावांमध्ये शनिवारपासून सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वी सांगली वगळता इतर तालुक्यांमध्ये याचे वितरण पूर्ण झाले असून, हे रॉकेल प्रतिलिटर ६१.६५ रुपयांनी मिळणार आहे.

सांगली जिल्ह्यासाठी एकूण १ लाख ३२ हजार लिटर रॉकेल मंजूर झाले असून, जिल्ह्यातील १३५६ रेशन दुकानांमार्फत त्याचे वाटप सुरू आहे. सांगली अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या अखत्यारीत सांगली, कुपवाड आणि २७ गावांचा समावेश होतो. या क्षेत्रासाठी ९ हजार लिटर रॉकेल उपलब्ध झाले आहे. काल दिवसभरात शहरी भागातील १४४ आणि ग्रामीण भागातील ७६ अशा एकूण २२० रेशन दुकानदारांकडे हे ९ हजार लिटर रॉकेल वितरित करण्यात आल्याची माहिती निरीक्षक राजू कदम यांनी दिली.

असे होणार वितरण मंजूर रॉकेल : ९ हजार लिटर

प्रति शिधापत्रिका (रेशन कार्ड) : ३ लिटर, दर : प्रतिलिटर ६१.६५ रुपये, लाभार्थी प्राधान्यक्रम : ज्यांना सध्या रेशनवर धान्य मिळते, अशा निराधार, अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना हे रॉकेल दिले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT