Crime News Pudhari
सांगली

Sangli Crime : चारित्र्याच्या संशयातून विवाहितेवर काठी हल्ला

रांजणी येथील धक्कादायक प्रकार ; दीर व चुलत सासू विरोधात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

कवठेमहांकाळ : रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथे चारित्र्याच्या संशयातून विवाहितेस शिवीगाळ, दमदाटी करत लिंबाच्या काठीने बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी दीर आणि चुलत सासू यांच्या विरोधात कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशा सुशांत गलांडे (वय 23, रा. रेल्वे स्टेशनजवळ, रांजणी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीर शरद बाळासाहेब गलांडे आणि चुलत सासू मंदाकिनी बाळासाहेब गलांडे (दोघे रा. रांजणी) यांनी घरगुती कारणावरून तसेच चारित्र्यावर संशय घेऊन फिर्यादी निशा यांना वारंवार त्रास दिला. शनिवार सायंकाळी त्यांनी शिवीगाळ करत निशा यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या भांडणानंतर पती सुशांत यांनी त्यांना माहेरी सोडले.

त्यानंतर सोमवार, दि. 18 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास निशा या आई-वडिलांना सोबत घेऊन सासरी रांजणी येथे आल्या. त्यावेळी दीर आणि सासू यांनी जुन्या वादावरून पुन्हा भांडण केले. वाद वाढत जाऊन दीर शरद गलांडे याने लिंबाच्या काठीने निशा यांच्या पाठीवर आणि डाव्या हातावर बेदम मारहाण केली. त्यांच्या आई-वडिलांनाही अर्वाच्य शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT