Crime News pudhari photo
सांगली

Sangli Crime: कवठेएकंद येथे दारू, जुगार अड्ड्यावर छापे

दोघांवर कारवाई : चार हजाराचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : कवठेएकंद (ता. तासगाव) येथे विनापरवाना सुरू असलेल्या मटका, जुगार आणि बेकायदा देशी दारू विक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून दोघांना रंगेहात पकडले. कारवाईत पोलिसांनी देशी दारू, जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा ४ हजार १५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉन्स्टेबल नीलेश राजाराम राक्षे (वय ३७) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश सुनील तपासे (वय ३१, रा. जुनी चावडीजवळ, कवठेएकंद) आणि मारुती रामचंद्र आडमुठे (वय ४५, रा. कवठेएकंद) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

संशयित गणेश तपासे हा गोसावी गल्लीत विनापरवाना देशी दारूची विक्री करत असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला दारूची विक्री करताना रंगेहात पकडले. त्याच्याकडून देशी दारूच्या १८० मिलिलीटरच्या ४२ बाटल्या असा ३ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तो मटकाही घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दुसऱ्या कारवाईत, मारुती आडमुठे हा ग्रामसचिवालयाच्या पाठीमागील गल्लीत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन जुगार चालवत असताना सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ६५५ रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. या दोन्ही संशयितांवर तासगाव पोलिसांनी कारवाई केली. अधिक तपास सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT