सांगली : सांस्कृतिक परंपरेला उजाळा देत येत आहे लावणीचा कार्यक्रम. कोकण ते मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील विदर्भ साऱ्या ठिकाणची विविध लावण्यांची शैली एकाच मंचावर अनुभवायला मिळणार आहे. सर्व लावणी रसिक महिलांसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. जिथे महिलाही बहारदार लावण्यांना शिट्यांची भरभरून दाद देतात आणि म्हणूनच आपल्या नृत्याविष्काराने महिलांना घायाळ करण्यासाठी लावणीसम्राज्ञी अर्चना सावंत येत आहे. निमित्त आहे, दैनिक पुढारी कस्तुरी क्लब आयोजित मदनाची मंजिरी या लावणी कार्यक्रमाचे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक 13 डिसेंबर रोजी भावे नाट्यगृह, हरभट रोड, सांगली येथे दुपारी 2.30 वाजता खास महिलांसाठी हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी सनटेक ॲग्रीकल्चर प्रॉडक्टचे प्रायोजकत्व लाभले आहे. सनटेक कंपनी 2019 पासून महाराष्ट्र, कर्नाटकात शेती क्षेत्रात काम करते. कंपनीचे एमडी ॲण्ड सीईओ सुभाष पाटील यांचा रिझर्ल्ट ओरिएंटेड शेती प्रॉडक्ट देण्याचा प्रयत्न असतो. सनटेक ॲग्रीकल्चरने ग्रीनोमिल हे सेंद्रिय खत बाजारात आणले आहे. कमित कमी किमतीत गुणवत्तापूर्ण खत शेतकऱ्यांना देण्याचा मानस सनटेक कंपनीचा राहिला आहे. वाढत्या शहरीकरणामुळे पशुपालनाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे उत्कृष्ट प्रतीचे शेणखत बाजारात उपलब्ध होत नाही. परंतु ग्रीनोमील हे शेणखत, गावखताला इतर सेंद्रिय खताला उत्तम पर्याय म्हणून उपलब्ध आहे.
दैनिक पुढारी कस्तुरी क्लब नेहमी सभासदांसाठी निवडक, दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी देत असतो. दीपावलीनंतर खास महिला वर्गाच्या आग्रहाखातर लावणीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यातून महिलांना अस्सल मराठमोळ्या लावण्यांवर ठेका धरून मनमुराद आनंद घेता येईल. यापुढेही खेळ पैठणीचा व सिनेकलाकारांच्या गाठीभेटी, झी मराठी आयोजित उत्सव नात्यांचा फॅशन शो, मकरसंक्रमण सोहळा, हळदी-कुंकू सोहळा असे विविध कार्यक्रम नियोजित आहेत. दैनिक पुढारी कस्तुरी क्लबच्या सभासद नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
कस्तुरी क्लबचे सभासद होण्यासाठी आता अंतिम संधी असून लवकरच सभासद नोंदणी करून लावणीसारख्या अनेक दर्जेदार मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे. सभासद होताच महिलांना बॉस कंपनीचा स्टेनलेस स्टील डबा देण्यात येणार आहे. अनेक लकी ड्रॉ व डिस्काऊंट कुपनचा खजिना उपलब्ध आहे. आजच कस्तुरी क्लबचे सभासद व्हा. निवडक जागा शिल्लक.
संपर्क : 7020767465, सोनाली ओतारी.