सांगली : संक्रांती पावन पर्वानिमित्त दैनिक पुढारी कस्तुरी क्लबतर्फे शनिवारी 24 जानेवारी रोजी विश्रामबाग खुले नाट्यगृह येथे दुपारी तीन ते सहा या वेळेत हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम महिलांमध्ये आपुलकी, स्नेह व सामाजिक एकोपा वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने महिलांसाठी येथील श्री नारायणी ग्रुपचे धमाकेदार डान्स आणि अभय कुलकर्णी यांच्या बहारदार गाण्यांची मैफिल असणार आहे. यासाठी सुप्रसिद्ध समर्थ न्यूरो अँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रायोजकत्व लाभले आहे.
कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व महिलांना गजराज ज्वेलर्सतर्फे वन ग्रॅम फार्मिंग नथ आणि सरोवर मसाले यांच्याकडून मसाले वाण स्वरूपात मिळणार आहेत. कस्तुरी सभासदांमधून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत. विजेत्या सभासदास फार्मिंग कोल्हापुरी साज, ठुशी मिळणार आहे. फार्मिंग ज्वेलरीसाठी गजराज ज्वेलर्स महिलांच्या पसंतीस अग्रस्थानी आहे. वेगवेगळ्या ट्रेंडिंग ज्वेलरी गॅरंटीसह महिलांना उपलब्ध करून दिल्या जातात. सरोवर मसाल्यांची चव सांगलीकरांच्या जिभेवर कायम रेंगाळत असते. यांच्या मसाल्यांमध्ये बनवलेले विविध पदार्थ अगदी चविष्ट आणि रुचकर होतात. त्यामुळे सांगलीकरांच्या स्वयंपाकात कायम सरोवर मसाले असतात. उपस्थित सर्व महिलांना सांगलीतील नंबर वन सरस्वती चहा यांच्याकडून चहा मिळणार आहे. सरस्वती चहा घ्यायचा आणि मनोरंजनात्मक असा हळदी-कुंकू कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटायचा. कार्यक्रमाचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन ‘कस्तुरी क्लब’ संयोजकांनी केले आहे.
संपर्क : 7020767465 सोनाली ओतारी
समर्थ न्यूरो हॉस्पिटल म्हणजे अचूक निदान
डॉ. रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘समर्थ न्यूरो हॉस्पिटल’ची आरोग्य सेवेत भरीव कामगिरी सुरू आहे. समर्थ न्यूरो हॉस्पिटल रुग्णसेवेत नवे मापदंड प्रस्थापित करत आहे. मेंदू व मज्जासंस्था विकारांवरील अद्ययावत उपचार, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांचा संघ आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांमुळे हॉस्पिटलने अल्पावधीतच रुग्णांचा विश्वास संपादन केला आहे. स्ट्रोक, मेंदूचे आजार, मणक्याचे विकार तसेच न्यूरो शस्त्रक्रियेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. वेळेवर अचूक निदान, योग्य उपचार आणि रुग्णकेंद्रित सेवा ही समर्थ न्यूरो हॉस्पिटलची ओळख बनली आहे.