सांगली : दैनिक पुढारी कस्तुरी क्लबतर्फे रविवारी 28 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4 ते 8 या वेळेत सर्व महिलांसाठी दांडिया आणि रास गरिबाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ओपन एअर थिएटर, खरे सांस्कृतिक हॉलसमोर विश्रामबाग सांगली येथे होणार आहे.
कस्तुरी क्लबतर्फे होत असणार्या कार्यक्रमांची महिला आतुरतेने वाट बघत असतात. त्यांच्यासाठी ही एक पर्वणीच असते. प्रत्येक महिन्यात कस्तुरीतर्फे वेगवेगळ्या सामाजिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन होत असते. रविवारी डीजे दांडिया या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी प्रसिद्ध गरबा निवेदिका सिमरन मानधना यांचे निवेदन आहे.
सांगलीतील अद्ययावत सर्वहित हॉस्पिटल यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. सर्वहित हॉस्पिटल येथे सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात. तज्ज्ञ डॉक्टर्स आणि अनुभवी स्टाफ कार्यरत असल्याने सर्व शासकीय योजनांचा लाभ रुग्णांना येथे मिळतो. रुग्णांसाठी नुकतेच संपूर्णपणे निर्जंतुक आणि स्वच्छ असणारे उपाहारगृह उभारण्यात आले आहे. इंटरनॅशनल ट्रेडिंग कंपनी 505 शुद्ध कापूर यांचे सुद्धा प्रायोजकत्व आहे. 1960 पासून कापूर उत्पादनाच्या क्षेत्रात विश्वासाने कार्यरत असणारे नैसर्गिक रसायनमुक्त व पूजा तसेच आयुर्वेदिक वापरासाठी ग्राहकांच्या पसंतीस पडलेले 505 कापूर, असा नावलौकिक आहे. सामान्यांना परवडणार्या किमतीत दर्जेदार सेवा हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.