pudhari
सांगली

Sangli sand smuggling: करजगीत वाळू तस्करीवर कारवाई; ट्रॅक्टरसह 2 ब्रास वाळू जप्त

जत तालुक्यातील उमदी मंडल विभागाच्या गस्ती पथकाने गुरुवारी पहाटे वाळू तस्करीविरोधात मोठी कारवाई करत करजगी परिसरात अवैध वाळू वाहतूक उधळून लावली.

पुढारी वृत्तसेवा

जत शहर : जत तालुक्यातील उमदी मंडल विभागाच्या गस्ती पथकाने गुरुवारी पहाटे वाळू तस्करीविरोधात मोठी कारवाई करत करजगी परिसरात अवैध वाळू वाहतूक उधळून लावली.

गुरुवारी पहाटे चार वाजता सापळा रचून एका ट्रॅक्टरवर छापा टाकण्यात आला असून ट्रॅक्टरसह अंदाजे 2 ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे चार वाजता करजगी-भिवर्गी रस्त्यावर लाल रंगाचा ट्रॅक्टर व पिवळ्या रंगाची ट्रॉली (विना नंबर प्लेट) यामधून अवैध वाळू वाहतूक केली जात होती. हे वाहन जयवंत कलबुर्गी यांच्या शेतातील घरासमोर वाळू डंप करत असताना गस्ती पथकाने छापा टाकून ताब्यात घेतले.

घटनास्थळी पाहणी केली असता सुमारे 2 ब्रास वाळू आढळून आली. सदर ट्रॅक्टर महादेव पट्टणशेट्टी यांचा असल्याची माहिती समोर आली आहे. या मोहिमेत मंडल अधिकारी सैपन जातगार, ग्राम महसूल अधिकारी आर. एम. इंगळे, तलाठी उदय गुरव, तलाठी विलास संकपाळ, तलाठी नितीन कदम, तलाठी मल्लू माळी तसेच इतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर सध्या संख येथील अप्पर तहसील कार्यालयात जमा करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT