कानडवाडीत माकडांचा धुमाकूळ 
सांगली

Sangli News : कानडवाडीत माकडांचा धुमाकूळ

बंदोबस्ताची ग्रामपंचायतीची वन विभागाकडे मागणी

पुढारी वृत्तसेवा

कुपवाड : कानडवाडी (ता. मिरज) येथे गेल्या काही दिवसांपासून माकडांनी धुमाकूळ घातला आहे. घरावरील कौले फोडणे, शेतकऱ्यांचे नुकसान करणे असे प्रकार दररोज घडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ हतबल झाले आहेत. वन विभागाने गावातील माकडे तातडीने पकडावीत, असे निवेदन माजी सरपंच अनिल शेगुणशे, उपसरपंच शीतल भोरे यांच्यासह सदस्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, कानडवाडी गावामध्ये माकडांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे. माकडे लहान मुले व महिलांच्या अंगावर धावून जात आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मानवी वस्तीमध्ये त्यांचा वाढणारा वावर ग्रामस्थांसाठी धोकादायक ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT