Dr Jitesh Kadam Dr Vijay Mahadik elected unopposed Pudhari
सांगली

Kadegaon Panchayat Samiti | कडेगाव पं. स. वर काँग्रेसचा झेंडा; सभापतीपदी डॉ. जितेश कदम, उपसभापतीपदी डॉ. विजय महाडिक बिनविरोध

पंचायत समिती निवडणुकीत एकूण आठ जागांपैकी सात जागांवर काँग्रेसचा विजय

पुढारी वृत्तसेवा

Dr Jitesh Kadam Dr Vijay Mahadik elected unopposed

कडेगाव शहर : माजी मंत्री स्व. आमदार डॉ. पतंगराव कदम आणि आमदार डॉ. विश्वजित कदम यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कडेगाव तालुक्यात काँग्रेसने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कडेगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे युवा नेते डॉ. जितेश हणमंतराव कदम, तर उपसभापतीपदी डॉ. विजय भिमराव महाडिक यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे कडेगाव पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकला आहे. निवड जाहीर होताच तालुक्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत एकूण आठ जागांपैकी सात जागांवर काँग्रेसने विजय मिळवत भाजपचा मोठा पराभव केला, तर भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. या निकालानंतर सभापतीपदासाठी डॉ. जितेश कदम आणि उपसभापतीपदासाठी डॉ. विजय महाडिक यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

या विजयामुळे कडेगाव पंचायत समितीवर पुन्हा काँग्रेसची सत्ता स्थापन झाली असून आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या प्रभावी नेतृत्वावर तालुक्यातील जनतेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केल्याचे मानले जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील संघटित नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे काँग्रेसला हे यश मिळाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. तसेच आमदार डॉ. विश्वजित कदम आणि सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण निवड प्रक्रिया सुरळीत आणि बिनविरोध पार पडल्याचेही सांगितले जाते.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कडेगावचे प्रांत अधिकारी रणजीत भोसले, तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी कामकाज पाहिले.

यावेळी माजी आमदार मोहनराव कदम, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, माजी जिल्हा परिषद सदस्या वैशालीताई कदम, सुनीता कदम, मोनिका कदम, नूतन पंचायत समिती सदस्य दिग्विजय कदम, हर्षवर्धन कदम, पंचायत समिती सदस्य पैलवान रणजीत पवार, सुप्रिया करांडे, भारती मिसाळ, राजकुंवर सूर्यवंशी, पूनम माळी यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजोबांच्या वारशाचा तिसऱ्या पिढीकडे मानाचा मुकुट

माजी आमदार मोहनराव कदम यांनी 1972 ते 1997 या कालावधीत देवराष्ट्रे जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदासह 1991 मध्ये खानापूर पंचायत समितीचे सभापती म्हणूनही काम पाहिले होते. त्यांचा विकासाभिमुख वारसा पुढे नेत आता तिसऱ्या पिढीतील डॉ. जितेश कदम कडेगाव पंचायत समितीचे सभापती झाले आहेत. खमक्या युवा नेतृत्व म्हणून

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT