Fraud Case Pudhari
सांगली

Sangli JCB Fraud: जेसीबीचे आमिष दाखवून ३.१० लाखांची फसवणूक

जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

जत : जेसीबी मशीन कमी किमतीत विकत देण्याचे आमिष दाखवून गुगवाड (ता. जत) येथील एका व्यक्तीकडून ३ लाख ९ हजार ९९९ रुपये रोख व ऑनलाइन स्वरूपात स्वीकारून जेसीबी न देता तसेच रक्कम परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अक्षयकुमार परगोंडा चौगुले (वय ३१, रा. गुगवाड, ता. जत) यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रियाज बुड्डण्णावर (वय ३४, रा. तुरकर शिगहळ्ळी, ता. बैलहोंगल, जि. बेळगाव, कर्नाटक) याच्यासह मक्तुमहुसेन शिलेदार (वय ३२, रा. निच्चनकी, ता. कित्तूर, जि. बेळगाव) या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१४ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजल्यापासून १२ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत गुगवाड येथे हा प्रकार घडला. संशयितांनी संगनमत करून चौगुले यांना कमी किमतीत जेसीबी विकत देण्याचे आश्वासन दिले. त्यावर विश्वास ठेवून चौगुले यांनी वेळोवेळी रोख तसेच ऑनलाइन पद्धतीने एकूण ३ लाख ९ हजार ९९९ रुपये दिले. मात्र, त्यांना जेसीबी न देता तसेच पैसेही परत न केल्याने त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT