माडग्याळ येथे 2 एप्रिलपासून श्री मल्लिकार्जुन देवाची यात्रा  
सांगली

Madgyal Mallikarjun Yatra : माडग्याळ येथे 2 एप्रिलपासून श्री मल्लिकार्जुन देवाची यात्रा

पाच दिवस सुरू राहणार यात्रा

पुढारी वृत्तसेवा

जत शहर : माडग्याळ (ता. जत) येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवाची वार्षिक यात्रा गुरुवार, दि. 2 एप्रिलपासून सुरू होणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेचे नियोजन पूर्ण झाले असून, यामध्ये शेतीमाल, जनावरे आणि प्रसिद्ध माडग्याळ मेंढ्यांचे भव्य प्रदर्शन हे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

यात्रा कमिटीच्या अध्यक्षा तथा सरपंच अनिता माळी आणि उपाध्यक्ष तथा उपसरपंच बाळासाहेब सावंत यांच्या उपस्थितीत यात्रेच्या नियोजनाची माहिती देण्यात आली. यात्रेनिमित्त खिलार जनावरांचे विशेष प्रदर्शन भरवण्यात येणार असून, येथे मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्रीची उलाढाल अपेक्षित आहे. यात्रेत येणाऱ्या जनावरांसाठी पिण्याचे पाणी, यात्रेकरूंसाठी फिरते शौचालय आणि इतर आवश्यक सोयीसुविधांची चोख व्यवस्था यात्रा कमिटीमार्फत करण्यात आली आहे.

गुरुवार, 2 एप्रिलरोजी श्री मल्लिकार्जुन देवाचे यात्रास्थळी आगमन आणि जनावरांच्या यात्रेची सुरुवात होईल. शुक्रवार, 3 एप्रिल रोजी रात्री करमणुकीचे विविध कार्यक्रम होणार आहेत. शनिवार, 4 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता करमणुकीचे कार्यक्रम होणार आहेत. रविवार, 5 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता कुस्ती मैदानाचे आयाजन करण्यात आले आहे. सोमवार, 6 एप्रिलरोजी सकाळी 9 वाजता जनावरांचे प्रदर्शन, उत्कृष्ट जनावरांची निवड आणि बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. यावर्षीच्या यात्रेत महिला कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. सुरक्षितता, पाणी आणि स्वच्छतेबाबत ग्रामपंचायतीने विशेष खबरदारी घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT