घरफोडी, FILE
सांगली

Sangli Crime : जतमध्ये सात लाखांची घरफोडी, सोन्याचे दागिने लंपास

सैनिकनगर परिसरातील घटना

पुढारी वृत्तसेवा

जत : जत शहरातील सैनिकनगर परिसरात घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्याने घराचे कुलूप व कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉक तोडून त्यामधील सोन्याचे दागिने असा एकूण ६ लाख ७८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेले. ही घटना रविवार, दि. ११ रोजी घडली. याबाबत लता मारुती हिप्परकर (वय ३०, रा. सैनिकनगर, जत) यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे १० वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या घराला कुलूप होते. यादरम्यान चोरट्याने घराच्या दरवाजाचे कोयंडे तोडले. त्यानंतर घरात प्रवेश करून कपाटाचे लॉक तोडले आणि आतील सोन्याचे दागिने लांबवण्यात आले.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये ५ लाख ८५ हजार रुपये किमतीचे पाच तोळ्यांचे सोन्याचे गंठण, तसेच ९३ हजार ६०० रुपये किमतीचे सुमारे दीड तोळ्याचे सोन्याचे फुले, झुमके व वेल यांचा समावेश आहे. या सर्व दागिन्यांची एकूण किंमत ६ लाख ७८ हजार ६०० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सायंकाळी हिप्परकर या घरात आल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर जत पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT