पडवळवाडी अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू 
सांगली

Sangli Accident : पडवळवाडी अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू

मृतांची संख्या दोन; १९ दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी

पुढारी वृत्तसेवा

​आष्टा : आष्टा-ईश्वरपूर रस्त्यावर पडवळवाडी फाट्याजवळ उभ्या असलेल्या टेम्पोला दुचाकीने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातातील दुसरे गंभीर जखमी योगेश पांडुरंग खंदारे (वय ४४, रा. आष्टा) यांचे शुक्रवार, दि. ९ रोजी उपचारादरम्यान निधन झाले. या अपघातात दुचाकीचालक राजेंद्र नामदेव वीरभक्त (वय ३५, रा. आष्टा) यांचा २३ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. खंदारे यांच्या निधनामुळे अपघातातील मृतांची संख्या दोन झाली आहे.

हा अपघात मंगळवार, दि. २२ सप्टेंबररोजी रात्री घडला होता. राजेंद्र वीरभक्त हे मित्र योगेश खंदारे यांच्यासह दुचाकीवरून (क्र. एमएच १० ईएम ३५०८) ईश्वरपूरहून आष्टा येथे येत होते. पडवळवाडी फाट्याजवळ अंधारात टेम्पो न दिसल्याने दुचाकीची त्यास धडक बसली.

अपघातात जखमी राजेंद्र वीरभक्त यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता, तर मागे बसलेले योगेश खंदारे गंभीर जखमी झाले होते. गेल्या १९ दिवसांपासून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते; मात्र शुक्रवारी त्यांचे निधन झाले. मृत योगेश खंदारे यांच्या पश्चात आई-वडील, बहीण, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. अपघाताबाबत विशाल रवींद्र पवार (रा. ईश्वरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आष्टा पोलिस ठाण्यात टेम्पो चालक नफिज खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT