सांगली

सांगली : येळवी परिसरात घोणस अळीचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतेत

मोहन कारंडे

जत; पुढारी वृत्तसेवा : जत तालुक्यातील येळवी, खैराव, माडग्याळ या परिसरात घोणस अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. खैराव, येळवी व सांगोला तालुक्यातील हंगिरगे येथील शेतकऱ्यांचा अळीने चावा घेतल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

घोणस अळीने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे केले आहे. या अळीच्या चाव्याने अर्धे शरीर बधीर होते. ही अळी प्रामुख्याने ऊसाच्या फडात, गवत व मका या पिकांवर जास्त प्रमाणात आढळून येत आहे. या अळीचे वैज्ञानिक नाव 'स्लग कॅटरपिल्लर' असे आहे. ब्लेड सारखी काटेरी आकार असलेली ही अळी विषारी आहे. पिवळा व हिरवा रंगाच्या या अळीच्या अंगावर काटे असतात. पिकांना अपायकारक असलेल्या या अळीचे शेतकर्‍यांसमोरही मोठे संकट उभे राहिले आहे.

घोणस अळी शक्यतो ऊस व गवतावर दिसून येते. घोणस आळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास कोणतेही स्पर्शजन कीटकनाशक फवारावे. यामुळे अळीचे नियंत्रण होऊ शकते. अळीने चावा घेतल्यास घाबरून न जाता जवळच्या डॉक्टरकडे जाऊन योग्य ते उपचार घ्यावेत.
– हणमंतराय मेडीदार, तालुका कृषी अधिकारी, जत

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT