उन्हाच्या तडाख्यामुळे रस्ते ओस, बाजारपेठांत शुकशुकाट 
सांगली

Sangli Heatwave : उन्हाच्या तडाख्यामुळे रस्ते ओस, बाजारपेठांत शुकशुकाट

पारा 39 अंशावर; घालमेल वाढली

पुढारी वृत्तसेवा

सांगली : शहर परिसराचे तापमान 39 अंशावर पोहोचल्याने लोकांची घालमेल वाढली आहे. त्यामुळे दुपारी बारा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत अघोषित संचारबंदीसारखी स्थिती निर्माण होत आहे. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठांत शुकशुकाट पसरत आहे. दोन दिवसात तापमान एक अंशाने वाढले आहे.

सकाळी नऊपासूनच उन्हाचा चटका बसत आहे. कमाल तापमान 39 ते 39.5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात आपली कामे आटोपण्यावर बहुतांश नागरिकांचा भर आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे सकाळी अकरापासूनच मुख्य रस्ते, बाजारपेठा ओस पडत आहेत. दत्त-मारुती रोड, कापड पेठ, सराफ कट्टा, राजवाडा चौक, सांगली-मिरज रोड आदी रस्त्यावर शुकशुकाट पसरत आहे. त्याचबरोबर सर्व शासकीय कार्यालये दुपारी सामसूम असतात. रसवंतीगृहे आणि शीतपेये विक्रीच्या दुकानात गर्दी वाढू लागली आहे. नागरिक टोपी, रूमाल, गॉगल आणि सैलसर कपड्यांचा वापर करताना दिसतात. घरोघरी रात्रंदिवस पंख्यांची घरघर सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT