हरिपूरच्या तरुणाचा गळ्यावर वार करून खून  
सांगली

Sangli Accident : हरिपूरच्या तरुणाचा गळ्यावर वार करून खून

रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून कृत्य; संशयित फरार : जयसिंगपूर पोलिसांकडून शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

जयसिंगपूर : कोथळीत चारचाकी वाहन अडवे मारण्याच्या कारणातून विकास बाबुराव बोेंद्रे (वय ४५, रा. हरिपूर, ता. मिरज, जि. सांगली) यांचा सुर्‍याने गळ्यावर वार करून खून करण्‍यात आला. मंगळवारी रात्री साडेआठला ही घटना घडली. दरम्यान, संशयित हल्लेखोर आणि रेकॉर्डवरील गुन्‍हेगार अभिनंदन ऊर्फ अभी राजगोंडा पाटील-धडेल (३६, रा. कोथळी, ता. शिरोळ) फरार झाला.

मंगळवारी रात्री विकास बोंद्रे हे हरिपूरकडे चारचाकी वाहनातून जात होते. यावेळी दुचाकीवरून संशयित अभी पाटील धडेल येत होतो. यावेळी चारचाकी व दुचाकी वाहनामध्ये कट मारण्याची घटना घडली. बाचाबाची झाल्यानंतर धडेल याने जवळील सुरी काढून विकास बोंद्रे यांच्या गळ्यावर मारून वार करून पळून गेला. दरम्यान, बोंद्रे यांना मित्राने सांगली सिव्हील रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत्‍यू झाल्‍याचे सांगितले.

सिव्हील रुग्णालय परिसरात समर्थकांची मोठी गर्दी

सांगली : कोथळी येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून विकास बोंद्रे यांच्यावर जीवघेणा खुनीहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत सिव्हील रुग्णालय परिसरात नातेवाईक आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

अचानक घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून, रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. घटनेचे वृत्त समजताच भाजपचे नेते अरविंद तांबवेकर, पृथ्वीराज पवार आदींनी सिव्हिल रुग्णालयात धाव घेत बोंद्रे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या खुनाची माहिती मिळताच हरिपूर येथील दुकाने, सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT