Vivah Muhurat  
सांगली

Vivah Muhurat : लग्नाआड आले गुरू-शुक्र; विवाह लांबणीवर

मुहूर्ताबाबत संभ्रम; विवाहेच्छुकांना ज्योतिषांचा सल्ला घेऊन विवाह करण्याचा पर्याय

पुढारी वृत्तसेवा

रविकांत जोशी

सांगली : हिंदू धर्मातील विवाह संस्काराला विशेष महत्त्व असून, विवाह निश्चित करताना शुभमुहूर्ताला प्राधान्य दिले जाते. पंचांगानुसार दरवर्षी तुलसी विवाहानंतर वधु-वरांचा विवाह केला जातो. परंतु यावर्षी विवाहासाठी गुरू आणि शुक्र या दोन्ही ग्रहांची स्थिती अडचण ठरणार असल्याची माहिती दिलीप गाडगीळ, पुरोहित सांगली यांनी दिली.

गुरू किंवा शुक्र अस्त असताना तसेच चातुर्मास, अधिकमास, आषाढ महिना, ज्येष्ठ महिना या काळात अनेक धार्मिक परंपरांमध्ये विवाह सोहळे टाळले जातात. त्यामुळे काही कालावधीत विवाह सोहळ्यांचे नियोजन लांबणीवर पडते. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा विवाह, दांपत्य आणि वैवाहिक जीवन सुखा-समाधानाचे करणारा ग्रह मानला जातो, तर गुरू हा शुभत्व, मांगल्य आणि धार्मिक संस्कारांचा मानला जातो. हे दोन्ही ग्रह अस्तंगत असताना पारंपरिक पंचांग पद्धतीनुसार विवाहाचे मुहूर्त काढले जात नाहीत.

दरम्यान, विवाहासाठी घाई असलेल्या कुटुंबांमध्ये मुहूर्ताबाबत संभ्रम निर्माण होत आहे. अशावेळी संबंधित वधू-वरांच्या जन्मकुंडल्या, ग्रहस्थिती आणि कौटुंबिक परंपरा विचारात घेऊन अनुभवी ज्योतिषांचा सल्ला घेणे योग्य ठरते. काही कुटुंबे धार्मिक विधींसाठी स्वतंत्र मुहूर्त निश्चित करण्याचाही पर्याय स्वीकारतात. चातुर्मास संपल्यानंतर विवाह सोहळ्यांचा हंगाम पुन्हा सुरू होतो. नोव्हेंबरच्या उत्तरार्धापासून विवाह मुहूर्त उपलब्ध होण्यास सुरुवात होत असून, डिसेंबरमध्येही काही शुभ तारखा आहेत. मात्र, स्थानिक पंचांग, तिथी, नक्षत्र आणि वधू-वरांच्या कुंडलीनुसार मुहूर्तात बदल होऊ शकतो. त्यामुळे केवळ मुहूर्ताच्या प्रतीक्षेत विवाहाचे नियोजन रखडविण्यापेक्षा ज्योतिषांचा योग्य सल्ला घेऊन निर्णय घेण्याकडे काही कुटुंबांचा कल वाढत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT