सांगली : विजय बंगला येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जयश्री पाटील, शेखर इनामदार, प्रकाश ढंग, सुरेश आवटी, विजय पाटील, शीतल लोंढे, उदय पाटील आदी उपस्थित होते. 
सांगली

Sangli Politics : भाजप-महायुतीच्या प्रचाराला गती

पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बैठका

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव व कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी सांगलीत प्रचाराला गती आली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विविध ठिकाणी बैठका घेतल्या.

जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या बंगल्यावर पदवीधर, शिक्षक मतदार व कार्यकर्त्यांची बैठक झाली. शहरात भाजपच्या दोन्ही उमेदवारांना वाढता प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.

या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, भाजप नेत्या जयश्री पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, सुरेश आवटी, विष्णुअण्णा पाटील खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील, मदनभाऊ युवा मंचचे अध्यक्ष शीतल लोंढे, उदय पाटील व प्रमुख नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. पदवीधर व शिक्षक मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करावे. तसेच कार्यकर्त्यांनी मतदारांशी थेट संपर्क साधून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या सांगली जिल्हा शाखेने सर्वोदय शिक्षण मंडळाचे सहसचिव विजय पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. या मुळे शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांना बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. बैठकीला कार्यकर्ते तसेच मदनभाऊ पाटील युवा मंचचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT