GST Pudhari File Photo
सांगली

Sangli News: 1 हजार 510 कोटींचा जीएसटी वसूल

5.74 टक्के वाढ ; औद्योगिक वसाहतींची कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

कुपवाड : सांगली, मिरज, कुपवाड, तासगाव, पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या औद्योगिक वसाहतीमधून सन 2025 -26 या आर्थिक वर्षात एकूण 1510 कोटींचा विक्रमी जीएसटी वसूल झाला आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षापेक्षा 5.74 टक्के जास्त वसूल झाला आहे.

सांगली, तासगाव, पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या औद्योगिक वसाहतींमधील उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, सेवा पुरवठादार यांच्याकडून सन 2025 -26 मध्ये मोठ्या प्रमाणात जीएसटी वसूल झाला आहे. मात्र, कुपवाड व मिरज एमआयडीसी आणि मिरज तालुका तसेच वाळवा, शिराळा या औद्योगिक वसाहत, व्यापारी, व्यावसायिक यांच्याकडून मागील आर्थिक वर्षापेक्षा सन 2025-26 मध्ये 7.08 टक्के (मायनस) कमी जीएसटी झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधून सन 2023-24 मध्ये 1243, सन 2024-25 मध्ये 1428 म्हणजे 185 कोटींची वाढ झाली होती, तर सन 2025-26 मध्ये 1510 म्हणजे 82 कोटींची वाढ झाली असली तरी 5.74 टक्के जीएसटी वसूल झाला आहे. याचे कारण म्हणजे केंद्र सरकारने काही उत्पादनात सन 2025-26 मध्ये जीएसटी कपात केली होती. त्यामुळे जीएसटी कमी प्रमाणात वसूल झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT