परप्रांतीय द्राक्ष व्यापाऱ्याची दहा लाखांची फसवणूक Pudhari
सांगली

Sangli News : परप्रांतीय द्राक्ष व्यापाऱ्याची दहा लाखांची फसवणूक

दोघांविरोधात तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : तासगावहून परराज्यात द्राक्षे पोहोच करण्याऐवजी ट्रक चालकाने परस्पर विकून द्राक्ष व्यापाऱ्यांची पावणेदहा लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी द्राक्ष व्यापारी शफिक यामीन माहिगीर (वय 45, रा. नजीबाबाद, उत्तरप्रदेश ) यांनी तासगाव पोलिसात दोघांविरोधात फिर्याद दिली.

ट्रकचालक अशोककुमार गुज्जर (रा. धोलपूर, राजस्थान), ट्रकमालक धर्मेंद्र रामलखन गुज्जर (रा. मुरैना, मध्यप्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.फिर्यादी शफीक हे तासगाव व परिसरात द्राक्षे व फळे खरेदी करून अन्य राज्यात विक्रीसाठी पाठविण्याचा व्यवसाय करतात. त्यांनी तासगाव परिसरातील गावांतून द्राक्षे व पेरू याची खरेदी केली होती. खरेदी केलेली द्राक्षे व पेरु मुजफ्फरनगर येथे पाठविण्यासाठी अशोक गुज्जर हा चालक असलेला ट्रक भाड्याने ठरविण्यात आला. फिर्यादी शफिक यांनी 19 मार्चरोजी रात्री 9 लाख 74 हजार 200 रुपयांची द्राक्षे व पेरू ट्रकमध्ये भरून संशयित अशोककुमार गुज्जर याच्या ताब्यात दिली. ऑनलाइन 42 हजार व रोख 2500 रुपये भाडे दिले.

मात्र अशोककुमार याचा मोबाईल गेल्या काही दिवसांपासून बंद होता. यामुळे शफीक यांनी ट्रक मालक धर्मेंद्र गुज्जर याला संपर्क साधला. त्यानेही उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे अशोककुमार गुज्जर व धर्मेंद्र गुज्जर या दोघांनी द्राक्षे व पेरू पाठविलेल्या द्राक्ष व्यापाऱ्याकडे माल पोहचवला नसल्याचे समोर आले. यामुळे त्यांनी पोलिसात फसवणुकीची तक्रार दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT