सांगलीत महिलांसाठी उद्या भव्य बाईक रॅली 
सांगली

सांगलीत महिलांसाठी उद्या भव्य बाईक रॅली

नोंदणीला प्रचंड प्रतिसाद; बक्षिसांची होणार लयलूट

पुढारी वृत्तसेवा

सांगली : दै. ‘पुढारी’, पुढारी न्यूज, टोमॅटो एफएम 94.3 आणि पुढारी कस्तुरी क्लबच्यावतीने खास गुढीपाडव्यानिमित्त आणि मराठी नववर्षानिमित्त सांगली नगरीत महिलांसाठी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी, 23 मार्च रोजी आयोजित या रॅलीच्यानिमित्ताने जिगरबाज महिला रस्त्यावर उतरून सक्षमीकरणाचा संदेश आणि शक्तीचा जागर करणार आहेत. या जल्लोषी रॅलीचे ट्रॅव्हल पार्टनर हेवन हॉलिडेज् हे असून सहप्रायोजक लियाड इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट अ‍ॅन्ड डिझाईन, हेल्थकेअर पार्टनर सेवासदन हेल्थकेअर ग्रुप, फूड पार्टनर उत्कर्ष भोजनालय, गिफ्ट पार्टनर सोनरूपम आहेत.

लेझीम पथकाचा थरार

या रॅलीत सहभागी होण्यासाठी महिलांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नावनोंदणीला भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. महिलांनी रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. रविवारी सकाळी साडेसहा वाजता दैनिक पुढारी भवनजवळ लेझीम पथक आणि ढोलवादनाने या रॅलीत सहभागी महिलांचे स्वागत केले जाणार आहे. साडेसहा ते सात वाजेपर्यंत महिलांनी या ठिकाणी उपस्थित राहणे अत्यावश्यक आहे. त्यांना फेटे बांधल्यानंतर साडेसात वाजता रॅलीला सुरुवात होणार आहे. रॅलीला उपस्थित राहिल्यानंतरसुध्दा नाव नोंदणी करण्याची सोय आहे.

‘पुढारी कस्तुरी क्लब’च्यावतीने महिला सक्षमीकरणाचे विविध उपक्रम नेहमीच राबविले जातात. ज्याचा लाभ सांगली जिल्ह्यातील अनेक महिलांना झाला आहे. आता त्याचाच एक भाग म्हणून दैनिक पुढारी वृत्तसमूहाच्यावतीने ही खास बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. सांगलीसह कोल्हापूर, पुणे, ठाणे आणि अहिल्यानगरमध्ये एकाच दिवशी एकाच वेळेस महिलांची ही सशक्त रॅली निघणार असून, यामध्ये परंपरा आणि सक्षमतेचा संगम साक्षात अनुभवता येणार आहे. सांगलीतील या रॅलीत शेकडो महिला पारंपरिक वेशात सहभागी होणार असून, त्यातून स्त्रीशक्तीचा नारा बुलंद होणार आहे. या रॅलीत सर्व महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: 7020767465, 8805007724.

नोंदणी आवश्यक

ही रॅली कस्तुरी क्लब सदस्यांसह सर्व महिलांना खुली असून सोबतचा क्युआर कोड स्कॅन करून नावनोंदणी करायची आहे. या रॅलीत महिलांनी पारंपरिक वेशात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोफत रक्त व नेत्र तपासणी

बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व महिलांची नेत्रतपासणी, रँडम शुगर, हिमोग्लोबिन यासह इतर तपासणी करण्यात येणार आहे. सेवासदन हेल्थ केअर ग्रुपचे संस्थापक डॉ. रविकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढारी भवन येथे या तपासण्या करण्यात येतील.

रॅलीचा मार्ग...

सकाळी 7.30 वाजता पुढारी भवन येथून सुरू होणारी ही रॅली राम मंदिर, काँग्रेस भवन, स्टेशन चौक, राजवाडा चौक, महापालिका, एसटी स्टॅन्ड, झुलेलाल चौक, सिव्हिल हॉस्पिटल, कर्मवीर चौक, विश्रामबाग चौकातून परत पुढारी भवन येथे येणार आहे.

बक्षीस : गोवा ट्रीप...

या बाईक रॅलीत सहभागी होणार्‍या एका भाग्यवान महिलेस पतीसह लकी ड्रॉच्या माध्यमातून हेवन हॉलिडेजकडून गोवा ट्रीप बक्षीस म्हणून मिळणार आहे. सहभागी होणार्‍या प्रत्येक महिलेला सोनरूपम यांच्याकडून आकर्षक भेटवस्तू कुपन मिळणार आहे.

  • नोंदणी केलेल्या सर्व सहभागी महिलांना सर्टिफिकेट.

  • सर्व सहभागी महिलांना चहा, नाश्ता.

  • ड्रेस कोड- पारंपरिक वेशभूषा, नऊवारी साडी, सफेद कुर्ता-जीन्स.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT