गोटखिंडीत केतनराज ॲकॅडमीत तीन मुलींवर लैंगिक अत्याचार 
सांगली

Sangli News : गोटखिंडीत केतनराज ॲकॅडमीत तीन मुलींवर लैंगिक अत्याचार

संस्थापक काशीनाथ नांगरे आणि त्याच्या पत्नीवर 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

​आष्टा : वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील 'केतनराज स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी' मध्ये निवासी शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन तीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्यचाराचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी ॲकॅडमीचा संचालक काशीनाथ रामचंद्र नांगरे आणि त्याला साथ देत मुलींना धमकी देणारी त्याची पत्नी मनिषा काशीनाथ नांगरे (दोघे रा. गोटखिंडी, ता. वाळवा)या दोघांवर आष्टा पोलिस ठाण्यात 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, ११ जून २०२६ पासून गोटखिंडी येथील ‘केतनराज स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी’मध्ये हा प्रकार वारंवार घडत होता. ॲकॅडमीत निवासी शिक्षण घेणाऱ्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील तीन अल्पवयीन मुली रात्री झोपेत असताना, संचालक काशीनाथ नांगरे याने मुलींच्या जवळ जाऊन त्यांच्याशी लैंगिक अत्याचार व विनयभंग केला.

हा संपूर्ण संतापजनक प्रकार पीडित मुलींनी जेव्हा ॲकॅडमीतील मॅडम आणि आरोपीची पत्नी मनिषा नांगरे हिच्या कानावर घातला, तेव्हा तिने मुलींना मदत करण्याऐवजी उलट "कोणाला काही सांगू नका, नाहीतर तुमचे शाळेचे नुकसान करेन" अशी थेट धमकी देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.

पीडित मुलींनी शेवटी हिंमत दाखवून आपल्या पालकांना या प्रसंगाची माहिती दिली. त्यानंतर संतप्त पालकांनी आष्टा पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून​भारतीय न्याय संहिता (BNS) कलम: ७४, ७५(२), ३५१ (२) ​बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायदा कलम: ८, ९(F), १०, १२ ​या कलमांन्वये काशीनाथ रामचंद्र नांगरे आणि मनिषा काशीनाथ नांगरे यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. अशा विकृत संस्थाचालकांवर आणि त्याला पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT