सांगली

सांगली : जत बसस्थानक परिसरात प्रवासी महिलेचे २० हजारांचे सोने लंपास

backup backup

जत; पुढारी वृत्तसेवा : जत बसस्थानक परिसरात आलेल्या एका महिला प्रवाशीचे गळ्यातील २० हजार किमतीचे सोने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना शुक्रवारी (दि. २०) पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबतची फिर्याद कमलाबाई केचाप्पा सायार (व६०) रा.वळसंग यांनी जत पोलिसात दिली.

याबाबत अधिक माहिती अशी कमलाबाई सायार या शुक्रवारी (दि. २०) जत बसस्थानक परिसरात आल्या होत्या. त्या प्रवासासाठी थांबल्या होत्या. या वेळेला अज्ञात चोरट्याने गळ्यातील २० हजार किमतीचे मंगळसूत्र लंपास केले केले. मंगळसूत्र लंपास केल्याचे लक्षात येताच शोधाशोध करण्यात आला परंतु कुठेही सापडून आले नाही. तदनंतर त्यांनी जत पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दिली आहे. या घटनेचा अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

एका महिन्यातील दुसरी घटना

जत बस स्थानक परिसरातूनन व बसमधून प्रवास करत असताना महिलांचे सोने जाण्याची ही दुसरी घटना आहे गतपंधरावाड्यात कर्नाटकातील एक महिला प्रवास करत असताना तिचे सोने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. त्यानंतर ही दुसरी घटना घडली आहे. सातत्याने अशा घटना घडत आहेत. महिलांवर पाळत ठेवून चोरी करणाऱ्या चोरट्याविरुद्ध मोहीम राबवण्याची मागणी होत आहे. चोरटे गर्दीचा फायदा घेऊन चोरी करतात व नंतर पलायन करतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT