अबब... गवारी तीनशे रुपये किलो! Pudhari Photo
सांगली

Sangli Gavar price : अबब... गवारी तीनशे रुपये किलो!

कर्नाटकातून तुरळक आवक; ग्राहकांकडून मात्र मागणी

पुढारी वृत्तसेवा

सांगली : गेल्या दीड, दोन महिन्यांपासून दीडशे रुपये किलो असलेली गवारी आता चार दिवसापासून तीनशे रुपये किलोवर गेली आहे. विक्रेते तीन ते चार किलोच गवारी घेऊन विक्री करताना दिसत आहेत. पहिल्यांदाच गवारी दराचा विक्रम झाला आहे. यापूर्वी दीडशे रुपये किलो दर हाच विक्रम होता.

सांगलीमध्ये स्थानिक परिसरातून देशी आणि बंदरी गवारीची आवक होत होती. गेला महिनाभर जवळपास हे उत्पन्न थांबले आहे. आठ दिवसापासून कर्नाटकातील अथणी, कागवाड तालुका आणि उगार, कुडची परिसरातून देशी गवारी येत आहे. घाऊक विक्रेते चार दिवसापासून 250 रुपये किलोने गवारीची विक्री करीत असल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी आता तीनशे रुपये किलोने विक्री सुरू केली आहे. किरकोळ विक्रेते 80 रुपये पाव किलो दर सांगून 75 रुपयांनी गवारीची विक्री करीत आहेत. येथील तरुण भारत क्रीडांगणासमोरील सकाळच्या घाऊक बाजारात अत्यंत तुरळक स्वरूपात गवारी विक्रीसाठी येत आहे. किरकोळ विक्रेत्यांकडे ग्राहक दर विचारून भुवया उंचावून परत जात आहेत. उत्पादन घटण्याचे नेमके कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT