गॅस एजन्सीसमोर गोंधळ 
सांगली

Sangli News : गॅस एजन्सीसमोर गोंधळ; पोलिसांचा हस्तक्षेप

कर्मचाऱ्यांचा पोबारा; आजपासून सुरळीत पुरवठ्याचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पंधरा दिवसांपासून गॅस सिलिंडर न मिळाल्याने संतप्त ग्राहकांनी संजयनगर येथील एका गॅस एजन्सीसमोर गोंधळ घातला. एजन्सीला कुलूप घालून कर्मचाऱ्यांनी पोबारा केल्याने चिडलेल्या ग्राहकांनी दगड घालून कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. संजयनगर पोलिसांनी हस्तक्षेप करून ग्राहकांची समजूत घातली. आजपासून (मंगळवार) गॅसपुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन एजन्सीकडून देण्यात आले. त्यानंतर गर्दी पांगली.

महिन्यापासून प्रतीक्षा यादी साडेचार हजारांहून अधिक झाली आहे. चार दिवसांपासून गॅस मिळेल, असे एजन्सी सांगत आहे. सकाळपासून ग्रामीण भागातील ग्राहक रिकामे सिलिंडर घेऊन एजन्सीसमोर जमले; पण गॅसची गाडीच आली नाही, असे सांगितल्यानंतर ग्राहकांचा संयम सुटला. अनेकजण सकाळपासून जेवण न करता थांबून होते.

मागणी अचानक वाढल्याने काही अडचणी आहेत. यातून एजन्सी आणि सेल्स ऑफिसर यांनी योग्य मार्ग काढणे अपेक्षित आहे. या एजन्सीमध्ये काय चूक आहे, याची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करू.
- आशिष फुलूके, जिल्हा पुरवठा अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT