Crime News pudhari photo
सांगली

Sangli Crime : गळवेवाडीत वृद्धाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

भांडण सोडविल्याच्या रागातून घरासमोर हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : गळवेवाडी (ता. आटपाडी) येथे भांडण सोडविल्याचा राग मनात धरून वृद्धाला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच मध्यस्थीसाठी आलेल्या वृद्धाच्या मुलीचे मंगळसूत्र खेचून तोडून कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना गुरुवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत लक्ष्मण हरीबा गळवे (वय ६०, रा. गळवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हणमंत हरीबा गळवे, शालन हणमंत गळवे (दोघे रा. गळवेवाडी) आणि खाशाबा खिलारी (रा. शेनवडी, ता. माण, जि. सातारा) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीनुसार, लक्ष्मण गळवे हे घरासमोर असताना हणमंत व शालन गळवे तेथे आले. ‘तुम्ही आमची भांडणे सोडविणारे कोण?’ असे म्हणत त्यांनी शिवीगाळ करून लक्ष्मण यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी फिर्यादीची मुलगी संध्या घेरडे ही मध्यस्थीसाठी आली असता शालन गळवे हिने तिचे गळ्यातील मंगळसूत्र खेचून तोडले. त्यानंतर संशयित खाशाबा खिलारी याने मंडपाचा बांबू काढून फिर्यादीच्या अंगावर धावून जात संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आटपाडी पोलिस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT