चिकू, पेरू, सफरचंदाचे दर उतरले 
सांगली

Sangli News| चिकू, पेरू, सफरचंदाचे दर उतरले

देशी केळीच्या दरात वाढ

पुढारी वृत्तसेवा

सांगली : या सप्ताहात फळांची आवक वाढल्याने दर उतरले आहेत. चिकू, सफरचंद, पेरू याचे दर उतरले असून, देशी केळीच्या दरात वाढ झाली आहे.

चिकू आता ८० ते १२० रुपये किलो आहेत. डाळिंबाचा दर तेजीत असून, दर २०० ते २५० रुपये किलो आहे. पेरूचा दर आता ८० ते १०० रुपये किलो आहे. सफरचंदाचा दर १५० ते २०० रुपये किलो आहे. स्थानिक बाजारपेठेतून आलेली सफरचंद शंभर रुपये किलोप्रमाणे विक्री सुरू आहे.

सीताफळाचा दर ८० ते १२० रुपये किलो आहे. काश्मीर सफरचंदाचा दर १५० ते २०० रुपये किलो आहे. ड्रॅगन फ्रूट १०० ते १५० रुपये किलो असून, नासपती १६० रुपये किलो आहे. ऑस्ट्रेलियन चेरी १८०० रुपये किलो आहे. विदेशी सफरचंद २०० ते २५० रुपये किलो असून, न्यूझिलंडचे सफरचंद २५० ते २६० रुपये किलो आहेत. रामफळ १४० ते १५० रुपये, देशी केळी ६० ते ८० रुपये डझन, वसई केळी ३० ते ४० डझन, पपई ३० ते ५० रुपये नग आहे. ही माहिती फळ विक्रेते अदनान मुन्शी यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT