Sangli Crime News
सांगली : सांगली शहरालगत असणाऱ्या चिंतामणीनगर येथे शुक्रवारी मध्यरात्री मित्रांनीच दारू पिताना झालेल्या वादातून दगडाने डोके ठेचून निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे. रोहित लक्ष्मण आवळे (वय 24) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.
रोहित आवळे हा त्याच्या काही मित्रांसमवेत चिंतामणीनगर येथील मोकळ्या पटांगणावर मध्यरात्री 2 वाजता दारू पिण्यासाठी बसला होता. यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणातून वाद झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी दगडाने डोके ठेचून रोहित याचा खून केला. काही हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या मागावर संजयनगर पोलिस ठाण्याचे पथक रवाना करण्यात आले आहे.