Fraud Case Pudhari
सांगली

Sangli Fraud Case : कमी व्याजदरात कर्जाच्या आमिषाने शिक्षकास ८६ हजारांचा गंडा

एकावर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : एका फायनान्स कंपनीचे पर्सनल लोन मंजूर करून घेतल्यानंतर, त्याहून कमी व्याजदराने दुसऱ्या कंपनीकडून कर्ज काढून देण्याचे अमिष दाखवून शिक्षकाची ८६ हजार ८४६ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत विकासनगर (मिरज) येथील शिक्षक राजेश तुकाराम वडर यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित प्रथमेश विजय भिसे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै २०२३ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत संशयित प्रथमेश भिसे याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्याने एका फायनान्स कंपनीचे लोन मंजूर करून घेऊन ती रक्कम स्वतःच्या खात्यावर भरण्यास भाग पाडले.

त्यानंतर कमी व्याजाने दुसरे कर्ज काढून देतो, असे सांगून एकूण ८६ हजार ८४६ रुपये उकळले. मात्र, कोणतीही रक्कम न देता फसवणूक केली. याप्रकरणी विजय भिसे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT