Accident 
सांगली

Sangli Accident : दोन दुचाकींच्या धडकेत चौघे जखमी

आटपाडी पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत फिर्यादीसह चार जण जखमी झाल्याची घटना घडली. हा अपघात २७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडल.

या प्रकरणी दिलीप दगडू गावडे (वय ६०, रा. गोंदिरा, ता. आटपाडी) यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून विजय गोरख चव्हाण (रा. सागरमळा, आटपाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित विजय चव्हाण हा आपल्या ताब्यातील दुचाकी (क्र. एमएच १५ बीवाय १२७३) भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवत होता. त्याने गावडे यांच्या दुचाकीस पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दिलीप गावडे यांच्यासह त्यांच्या नाती तन्वी व हर्षदा आणि शौर्य हे चौघे जखमी झाले. तसेच अपघातात दोन्ही दुचाकींचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT