सांगली : या सप्ताहात खाद्यतेलाच्या दरात पुन्हा वाढ झाली. खोबरे दरात किरकोळ घसरण झाली असली तरी खोबरेल आणि नारळाचे दर तेजीतच आहेत. इतर किराणा मालाचे दर मात्र स्थिर आहेत.
खाद्यतेलाच्या दरात प्रति किलो पाच रुपयांनी वाढ झाली आहे. 152 रुपयावरुन खाद्यतेल आता 156 ते 158 रुपये किलो झाले आहे. खोबरे दर प्रति किलो आठ ते दहा रुपयांनी उतरले आहेत. नारळ आणि खोबरेल तेलाचे दर तेजीतच आहेत. खोबरेल 400 रुपये किलो असून, नारळ 35 ते 40 रुपये नग झाला आहे. खाद्यतेल आता 156 ते 158 रुपये झाले आहे. पोहे, रवा आणि मैद्याचे दर स्थिर आहेत. रवा आणि मैदा 40 ते 42 रुपये किलो आहे. सूर्यफूल तेलाचा दर 160 रुपये झाला आहे. शेंगतेलाचा किरकोळ विक्रीचा दर 162 ते 168 झाला आहे. सरकी तेल डब्याचा दर (15 किलो) 2 हजार 300 रुपये होता, तो आता 2 हजार 400 रुपये झाला आहे. सूर्यफूल तेलही 2200 रुपये झाले आहे. शेंगतेलाचा दर 2 हजार 500 ते 2 हजार 600 आहे. सर्वसाधारण तांदूळ हा 30 ते 60 रुपये किलो आहे. हरभराडाळ, तूरडाळीचे दरही या सप्ताहात स्थिर राहिले. तूरडाळीचा दर 150 रुपये असून, हरभराडाळ 85 ते 90 रुपये किलो आहे. मूगडाळीचा दर 90 ते 100 रुपये किलो झाला आहे.
सर्वसाधारण तांदळाचा दर प्रति किलो 30 ते 60 रुपये आहे. गहू दर 3 हजार 400 ते 4 हजार 500 रुपये क्विंटल झाला आहे. शाळू ज्वारी 40 ते 50, हायब्रीड 40 ते 42, गूळ 50 ते 55, मसूरडाळ 90 ते 100 रुपये किलो आहे.