ढालगावमध्ये किराणा दुकानाला आग 
सांगली

Sangli Fire : ढालगावमध्ये किराणा दुकानाला आग

लाखो रुपयांचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

नागज : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील प्रशांत शिवरुद्र शेटे यांच्या किराणा मालाच्या दुकानाला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत दुकानातील संपूर्ण किराणा माल जळून खाक झाला असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

ढालगाव-ढालेवाडी रस्त्यालगत जिल्हा परिषद शाळेजवळ प्रशांत शेटे यांचे 'प्रार्थना ट्रेडर्स' नावाचे किराणा दुकान आहे. शुक्रवारी रात्री दुकान बंद करून ते घरी गेले होते. दरम्यान, मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. शनिवारी पहाटेच्या सुमारास दुकानातून धूर व आगीच्या ज्वाला निघत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यांनी बोअरवेलच्या साहाय्याने पाण्याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने तोपर्यंत दुकानातील लाखो रुपये किमतीचा संपूर्ण माल जळाला. कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT