सांगली : फायनान्स कंपनीचे हफ्ते गोळा करून चौघांनी 6 लाख 62 हजार 550 रुपयांची रक्कम हडप केली. याप्रकरणी भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड या कंपनीचे हर्षद अजित सुतार यांनी चौघांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मोनेश शांबकर बडीगर, मायकल बाळू माने (दोघे रा. शहापूर, जि. कोल्हापूर), रवींद्र विठ्ठल पोवार (रा. कुची, ता. कवठेमहांकाळ) आणि सुयोग सुरेश पाटील (रा. हेळगाव जि. सातारा) अशी त्यांची नावे आहेत.
भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड या कंपनीकडून 57 महिलांना कर्ज पुरवठा करण्यात आला होता. संबंधित 57 महिलांकडून चौघांनी 6 लाख 62 हजार 550 रुपयांचे हफ्त्याची रक्कम गोळा केली होती. ती रक्कम त्यांनी भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड कंपनीमध्ये भरणे गरजेचे होते. परंतु ती रक्कम त्यांनी न भरता फायनान्स कंपनीची फसवणूक केली. याबाबत कंपनेचे अधिकारी हर्षद सुतार यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.