खत दरवाढीचा फटका; विक्रेते संभ्रमात 
सांगली

Sangli : खत दरवाढीचा फटका; विक्रेते संभ्रमात

शेतकर्‍यांचे आर्थिक नियोजन कोलमडले, दुकानदारांवर ‘लिंकिंग सेल्स’चा दबाव

पुढारी वृत्तसेवा

विजय रूपनूर

जत : शेतकरी आधीच अवकाळी पाऊस, कीडरोग, बाजारभावातील अनिश्चितता अशा संकटांना तोंड देत असताना, आता रासायनिक खतांच्या दरवाढीने शेतकर्‍यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. ऐन हंगामात अचानक दरवाढ झाल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. खतांमध्ये प्रति गोण्यामागे 450 इतकी दरवाढ झाली आहे.

विविध मिश्र खतांचे दर वाढले, परंतु शेतीमालाचे भाव अजूनही म्हणावे तसे वाढले नाहीत. द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला, ऊस अशा प्रमुख पिकांना बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांना हंगामाचा हिशेब जुळवणे कठीण झाले आहे.मिश्र खताचा दर 1 हजार 350 वरून 1 हजार 500 असा वाढला आहे. 10-26-26 चा दर 1 हजार 650 झाला आहे. म्युरेट ऑफ पोटॅश 1 हजार 900 असा आहे. तसेच 1 हजार 650 वरून खत 2 हजार 100 झाला आहे. यामध्ये तब्बल साडेचारशे रुपये इतकी प्रति गोणी 50 किलो मागे दर वाढला आहे. 15-15-15 हे संतुलित खत 1 हजार 850 रुपयांवरून 1हजार 450 ते 1 हजार650 च्या दरम्यान आहे. यामुळे प्रत्यक्ष पिकांच्या हंगामी गरजेला आवश्यक असलेले खत शेतकर्‍यांना जादा दराने घ्यावे लागत आहे.

रासायनिक खतांचे वाढलेल्या दराचा दैनंदिन उलाढालवरही याचा प्रतिकूल परिणाम होत आहे.रासायनिक खतांचे दर संतुलित असणे नितांत गरज आहे. खतांच्या दरामुळे मागणी कमी होत आहे.
अर्जुन सवदे, कृषी केंद्र जत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT