अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशाच्या बहाण्याने गंडा Pudhari File Photo
सांगली

Sangli fraud : महाविद्यालयात प्रवेशाच्या बहाण्याने गंडा; पाचजणांकडून उकळली १२ लाख ८४ हजाराची रक्कम

एकावर गुन्हा; चौकशी सुरू

पुढारी वृत्तसेवा

सांगली : येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने पाचजणांना तब्बल 12.84 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला होता. आता याप्रकरणी मयुरेश मधुसूदन अभ्यंकर यांनी दिनेश संजय पुजारी (रा. विश्रामबाग, सांगली) याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मयुरेश अभ्यंकर यांचा मुलगा सांगलीतील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतो. डिग्रीला प्रवेश मिळण्यासाठी दिनेश पुजारी हा मदत करतो व त्याच्यामार्फत गेल्यास संबंधित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश निश्चित मिळतो, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार मयुरेश अभ्यंकर यांनी त्याच्याशी संपर्क साधला होता. त्यानुसार त्याने माझी मॅनेजमेंटमध्ये ओळख आहे. तुम्हाला प्रवेश हवा असल्यास 3 लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली. त्यानंतर पुन्हा अतिरिक्त 2 लाख रुपयांची मागणी करून एकूण 5 लाख रुपये घेतले होते. 5 लाख रुपये देऊनही प्रवेश न मिळाल्याने मयुरेश अभ्यंकर यांनी त्याच्याकडे पैसे परत देण्यासाठी तगादा लावला होता. परंतु त्याने ते पैसे परत दिले नव्हते. त्यानंतर अभ्यंकर यांच्यासह अन्य चौघांना त्याने गंडा घातल्याचेही समोर आले होते. यामध्ये विवेक बाबासाहेब माने यांच्याकडून 3 लाख 50 हजार, मुकुंद आण्णा कुंभार यांच्याकडून 2 लाख 84 हजार आणि शिरीष कृष्णाजी पाटील यांच्याकडून 1 लाख 50 हजार रुपये असे एकूण 12 लाख 84 हजार रुपये उकळल्याचे समोर आले.

पैसे घेतलेल्यांपैकी कोणालाही त्याने प्रवेश मिळवून दिला नव्हता. त्यामुळे सर्वांनी त्याच्याकडे पैसे परत देण्यासाठी तगादा लावला. यावेळी त्याने नोटरी करून चेक दिले, पण बँक खात्यात पैसे नसल्याने त्याने दिलेले चेक वठले नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT