कुकटोळीत शेततळ्यात बुडून वृद्धेचा मृत्यू 
सांगली

Sangli Drowning Death : कुकटोळीत शेततळ्यात बुडून वृद्धेचा मृत्यू

पाणी आणताना कागदावरून पाय घसरला

पुढारी वृत्तसेवा

कवठेमहांकाळ : कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथे शेततळ्यात पाणी आणण्यासाठी गेलेल्या वृद्ध शेतकरी महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. २७) सकाळी ही घटना उघडकीस आली. नीलाबाई शिवाजी भोसले (वय ६६, रा. कुकटोळी) असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुकटोळी येथील खंडेराजुरी मार्गावर, सौरऊर्जा प्रकल्पाच्या बाजूला नीलाबाई भोसले यांचे घर आहे. घराच्या मागील बाजूस सुमारे शंभर मीटर अंतरावर त्यांचे शेततळे आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्या शेततळ्यातून पाणी आणण्यासाठी गेल्या असताना, शेततळ्याच्या अस्तर कागदावरून पाय घसरल्याने त्या तोल जाऊन पाण्यात पडल्या आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT