उमदीत वृद्धावर कोयत्याने हल्ला; प्रकृती चिंताजनक File Photo
सांगली

Sangli : उमदीत वृद्धावर कोयत्याने हल्ला; प्रकृती चिंताजनक

सायकल दुकानातील चोरीच्या संशयावरून प्रकार

पुढारी वृत्तसेवा

जत : उमदी (ता. जत ) येथे भरदिवसा एका हॉटेलमध्ये ज्येष्ठ पत्रकारावर कोयत्याने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. मलकारी दत्तात्रय वायचळ (वय 68, रा. बसवेश्वर मंदिराजवळ, उमदी) असे जखमीचे नाव आहे. सोमवारी (दि. 15) सकाळी ही घटना घडली. याबाबत उमदी पोलिस ठाण्यात मलकारी वायचळ यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी संशयित गजेंद्र ऊर्फ गजू बाळासाहेब वायचळ (वय 56, रा. उमदी) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे.

संशयित गजेंद्र याचे सायकल दुरुस्तीचे, तर मलकारी यांचे पेपर विक्रीचे दुकान आहे. काही दिवसापूर्वी संशयित गजेंद्र याच्या दुकानात चोरी झाली होती. तो उमदी पोलिसात तक्रार देण्यास गेला होता. मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नाही. या कारणातून मलकारी वायचळ यांनी पोलिसांवर दबाव आणल्याने तक्रार घेतली नाही, अशा संशयातून गजेंद्र याने मलकारी यांना त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. सांगलीच्या ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन ठसे घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT