सांगली : सीईटी, कॅप राऊंडबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, ॲडमिशन प्रोसेसची संपूर्ण माहिती, टॉप कोर्सेसबाबत माहिती, करिअरच्या विविध संधींबाबत सविस्तर माहिती, स्कॉलरशिप व शैक्षणिक कर्ज मार्गदर्शन, तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून थेट कौसिलिंग... याबाबतची सारी माहिती एकाच दिवशी, एकाच ठिकाणी मिळण्याची संधी दैनिक पुढारीच्यावतीने आयोजित पुढारी कॅम्पस टू करिअर या सेमिनारमुळे विद्यार्थी व पालकांना मिळणार आहे. आज दि. १२ रोजी ईश्वरपूर येथे हा सेमिनार होत असून १४ रोजी तो सांगलीमध्ये होणार आहे.
बारावीचा महत्त्वाचा टप्पा पार केल्यानंतरच खऱ्याअर्थाने करिअरला दिशा मिळत असते. या वळणावर विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या करिअरविषयक मार्गदर्शनासाठी दैनिक पुढारीच्यावतीने पुढारी कॅम्पस टू करिअर या अत्यंत महत्त्वाच्या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी आयोजित हा सेमिनार अगदी मोफत आहे. या उपक्रमासाठी पूर्वनोंदणी अनिवार्य असून, कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. माहितीसोबत सेमिनारमध्ये सहभागी झालेल्या निवडक विद्यार्थ्यांना तीन विद्यापीठांना भेट देण्याची संधीही मिळणार आहे.
लाभ घेण्याचे आवाहन...
अभियांत्रिकी, वैद्यकीय, बी. फार्मसी, व्यवस्थापन, तसेच इतर सर्व अभ्यासक्रमांसाठी असलेली संपूर्ण प्रवेश प्रक्रिया सोप्या भाषेत समजाऊन सांगितली जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी या सेमिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. करिअरबाबत अनेक प्रश्नांची उत्तरे विद्यार्थी व पालकांना या सेमिनारमध्ये मिळणार आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना योग्य निर्णय घेण्यास मदत होणार आहे.
ईश्वरपूर सेमिनारमधील मार्गदर्शक
११ ते ११.२० - प्रा. डॉ. अवधूत अत्रे
११.२० ते ११.४० - मुकेश अगरवाल
११.४० ते १२- डॉ. स्वप्निल सोनकांबळे/ डॉ. मिलिंद ओव्हाळ
१२ ते १२.२० - शंतनू देशपांडे
१२.२० ते १२.४० - अजित गट्टे
महत्त्वाची संधी...
प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. सोप्या भाषेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन. प्रवेश प्रक्रिया ते कॉलेज निवडीपर्यंत संपूर्ण माहिती. शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज प्रक्रियेचे मार्गदर्शन. निवडक विद्यार्थ्यांना तीन नामांकित विद्यापीठांना भेट देण्याची संधी. अधिक माहितीसाठी संपर्क : 95700 17003
सांगली आणि ईश्वरपूरमध्ये सेमिनार
आज दि. १२ जून – यशवंतराव चव्हाण कॉलेज, इस्लामपूर
१४ जून – रजपूत शैक्षणिक संकुल, व्हाईट हाऊस, गुलमोहर कॉलनी, रिलायन्स मार्केटसमोर, सांगली. या उपक्रमासाठी पूर्वनोंदणी अनिवार्य आहे.