Accident News Pudhari
सांगली

Sangli Accident : नशेत तरुण पडला आणि कार अंगावरून गेली...

कराडच्या जखमीचा मृत्यू; सांगली बस स्थानकाजवळील घटना

पुढारी वृत्तसेवा

सांगली : दारूच्या नशेत रस्त्यावर पडलेल्या तरुणाच्या अंगावरून भरधाव कार गेल्याने त्याचा मृत्यू झाला. सांगली बस स्थानकाजवळ ही घटना घडली. जयंत लक्ष्मण पवार (वय ३६, रा. कराड, जि. सातारा) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी (एमएच ०२ डीएन ६०९३) या क्रमांकाच्या कार चालकावर गुन्हा दाखल आहे.

जयंत हा दि. ४ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सांगली बसस्थानक येथून निघाला होता. त्यावेळी तो नशेत असल्याने तोल जाऊन रस्त्यावर पडला. त्याचवेळी वेगाने येणारी कार त्याच्या अंगावरून गेली. त्याला तातडीने सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रस्त्यावर समोर पडलेल्या तरुणाकडे न पाहता, रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून अपघात केल्याप्रकरणी कारचालकाविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद आहे. अपघात घटनास्थळी लोक हळहळ व्यक्त करत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT